32.7 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home राजकीय शुभा राऊळ भाजपामध्ये ?

शुभा राऊळ भाजपामध्ये ?

0
28

मुंबई, दि. 2 – संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने विभागप्रमुखांच्या माध्यमातून गुपचूपपणे एबी फॉर्मचे वाटप केले पण तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट होताच शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांनी बंडाचे संकेत दिले आहेत. शिवसेनेचे परळ-लालबागमधील नगरसेवक नाना आंबोले यांच्यापाठोपाठ मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या बोरिवलीतील नगरसेविका शुभा राऊळ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना उपनेते डॉ.विनोंद घोसाळकर आणि त्यांचा पूत्र सेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या जाचक त्रासाला त्या कंटाळल्या होत्या.