27.3 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home क्रीडा ‘प्रोग्रेसिव्ह’च्या र्शृती ब्राम्हणकरचे सुयश

‘प्रोग्रेसिव्ह’च्या र्शृती ब्राम्हणकरचे सुयश

0
23

गोंदिया : महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाव्दारा आयोजित विभागीयस्तरावर थाई बॉक्सींग स्पर्धेत १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या वयोगटातून उमाबाई बहुउद्येशिय शिक्षण संस्था व्दारा संचालीत प्राग्रेसिव्ह सायन्स ज्यु. कॉलेज गोंदियाची विद्यार्थिनी र्शृती ब्राम्हणकरचा राज्यस्तरावर थाई बाक्सिंग स्पर्धेत निवड झाली.
जिल्हा व विभागीय क्रीडा विभागाव्दारा कांस्यपदक देऊन विजयी र्शृतीचा गौरव करण्यात आले. १९ वर्ष स्पध्रेत ५४ ते ५७ वजनगटात राज्य स्तरावर थाई बॉक्सिंगमध्ये तृतीय स्थान प्राप्त करून ब्रान्स मॅडलची मानकरी ठरली. र्शृतीने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबाना त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, सचिव निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदीनी तावाडे, वाय. आशा राव, अभय गुरव, वीणा कावळे, कृष्णा चव्हाण आदींनी अभिनंदन केले.