24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात झेपावली; इस्त्रोचे विश्वविक्रम

एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात झेपावली; इस्त्रोचे विश्वविक्रम

0
45

चेन्नई, दि. 15 – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. चेन्नईपासून १२५ कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी एकाच वेळी १०४ उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येणार आहे.
रशियाच्या अंतराळ संस्थेने एका वेळी ३७ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्या तुलनेत भारताचे हे यश मोठे आहे. यापूर्वी भारताने जून २०१५ मध्ये २३ उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण केले होते. भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता.
याशिवाय दुसऱ्या रॉकेटमध्ये दोन अन्य भारतीय सूक्ष्म उपग्रह असून, त्यांचे वजन १,३७८ किलो आहे. भारतीय नॅनो सॅटेलाईट आयएनएस-१ व आयएनएस-१बी यांना पीएसएलव्हीवर मोठ्या उपग्रहांना मदत करण्यासाठी विकसित करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या नॅनो सॅटेलाईटचे प्रक्षेपण इस्रोची व्यावसायिक शाखा एन्ट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी केले जात आहे. कार्टोसॅट-२ साखळीतील मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

blank