गोंडी चित्रकला कार्यशाळा;पुण्याच्या ८५ वर्षीय आजीबाईंनीही रेखाटले चित्र

0
30

गोंदिया दि. 15 : पूर्व विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया महोत्सवाला १ डिसेंबर २0१६ रोजी पासून सुरुवात झाली. १४ फेब्रुवारी २0१७ पर्यंत या महोत्सवाचा कालावधी असून १२ फेब्रुवारी रोजी या महोत्सवानिमित्त गोंडी चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये जिल्ह्यातील २00 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध चित्रे रेखाटली.पुण्याहून गोंदियाला पाहुण्या म्हणून आलेल्या हिराबाई पुणेकर या ८५ वर्षीय आजीबाईंना चित्रकला कार्यशाळेची माहिती होताच त्यांनी देखील आमंत्रणाची फिकीर न करता या कार्यशाळेत हजेरी लावली. तर त्यांनी थेट चित्रकलेच्या माध्यमातून शैक्षणिक ज्ञान कसे दिले जाते आणि विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वाचनाची आवड चित्रांच्या माध्यमातून कशी लावयची या आधारावर पेन्सिल आर्ट्सच्या माध्यमांतून अभ्यास करताना मुलगा व त्याची आई असे चित्र तयार करत चिमुकल्यांना आकर्षित केले.
जिल्ह्याला नव्याने लाभलेले जिल्हाधिकरी अभिमन्यू काळे यांच्या अभिनव संकल्पनेतून या वर्षी गोंदिया मोहत्सव फक्त सारस पक्ष्यांपर्यंतच र्मयादित न ठेवता या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांसाठी रोजगार निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून यंदा रोजगाराला प्राधान्य देत. काळे यांनी आदिवासी तसेच गोंड जमातीच्या लोकांच्या विकासासाठी विशेष भर देत, गोंडी संस्कृती आणि गोंदिया चित्रकला वाव देण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच गोंडी चित्रकला कार्यशाळा आयोजित केली. गोंडी चित्रकारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शाळेतील २00 च्या वर विद्यार्थ्यांना गोंडी चित्रकला काय आहे आणि त्याचे महत्त्व काय हे समजावून सांगण्यासाठी गोंडी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असता विद्यार्थ्यांनी देखील या चित्रकलेला प्राधान्य देत काहीतरी नवीन शिकायला मिळत असल्याने आनंद व्यक्त केला. मंगळवारला घेण्यात आलेल्या गोंडी चित्रकला कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या पेंटिंग जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात लावण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये गोंडी चित्रकलेविषयी आवड निर्माण होईल आणि या माध्यमांतून भविष्यात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे मत जिल्हाधिकरी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले. यावेळी तयार करण्यात आलेल्या चित्रकलेची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे सौभाग्यवतींसह उपस्थित झाले होते. कमी वेळेत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात चिमुकल्यांनी सुंदर चित्र काढले असल्याने हा महोत्सव इथेच न थांबवता दर तीन महिन्यात या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ गोंडी चित्रकारांकडून प्रशिक्षण देणार असल्याचे जिल्याधिकारी काळे यांनी सांगितले. तर आपल्याला काही नवीन शिकण्याला मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.