24.4 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News तामिळनाडू मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अपहरणकर्ता, गुन्हा दाखल

तामिळनाडू मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अपहरणकर्ता, गुन्हा दाखल

0
27

चेन्नई, दि. 15 – तामिळनाडूत राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना अगोदरच गोत्यात अडकलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार शशिकला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शशिकला यांच्याच पक्षातील आमदार एस सर्वनन यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर शशिकला आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार पलानीसामी यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुवाथूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.