माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

0
93

नागपूर, दि. 14 : माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी
सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात येत
आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांना मे/जून 2017 मध्ये विभागीय मंडळनिहाय
प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी तज्ज्ञांची समान
आवश्यक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. मार्गदर्शक वरिष्ठ
महाविद्यालयीन शिक्षक, विद्यापीठ स्तरावरील शिक्षक, शिक्षणशास्त्र
महाविद्यालयातील शिक्षक, माध्यमिक शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील
शिक्षक असावा.
वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण तज्ज्ञांसाठी अर्हता शिक्षकांचा
माध्यमिक शाळेमध्ये प्रत्यक्ष शिकविण्याचा शैक्षणिक अनुभव किमान 12 वर्ष
सेवा पूर्ण झालेला असावा, शिक्षकांचे स्वत:चे वरिष्ठ वेतनश्रेणी
प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे, वरिष्ठ महाविद्यालय/शिक्षणशास्त्र
महाविद्यालय/विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 15
वर्षाचा असावा.
निवडश्रेणी प्रशिक्षणातज्ज्ञांसाठी अर्हता शिक्षकांचा
माध्यमिक शाळेमध्ये प्रत्यक्ष शिकविण्याचा शैक्षणिक अनुभव किमान 24 वर्ष
सेवा पूर्ण झालेला असावा, शिक्षकांचे स्वत:चे वरिष्ठ वेतनश्रेणी
प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे, वरिष्ठ महाविद्यालय/शिक्षणशास्त्र
महाविद्यालय/विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 15
वर्षाचा असावा.
माध्यमिक शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी पात्र
असलेल्या तज्ज्ञांनी अर्जाची छायांकित प्रत शाळेच्या माख्यध्यापकांमार्फत
दिनांक 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत राज्यमंडळ कार्यालयास सादर करावे.
अथवा http:/training.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा.
असे आवाहन पुणे राज्यमंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.