26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home राष्ट्रीय देश बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 50 हजारावर

बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 50 हजारावर

0
37

मुंबई, दि. 20 – नोटाबंदी निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले असून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून बचत खात्यातून आठवड्याला 50 हजारापर्यंत रक्कम काढणं शक्य होणार आहे. यापुर्वी ही मर्यादा 24 हजार इतकी होती. नोटाबंदी निर्णयानंतर बँकेतून आठवड्याला फक्त 24 हजारापर्यंत रक्कम काढणं शक्य होतं. पण आता हा रकमेचा आकडा 50 हजार करण्यात आला आहे. बँकेतील बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार किंवा महिन्याला 96 हजार रूपये रक्कम खूपच कमी असल्यानं रिझर्व्ह बँक लवकरच हे निर्बंध उठवणार असल्याचं अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी काही दिवसांपुर्वी स्पष्ट केलं होतं.13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगोदरच यासंदर्भात घोषणा केली आहे.

blank