24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ ‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’संविधान चौकात आंदोलन

‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’संविधान चौकात आंदोलन

0
19

नागपूर,berartimes.com दि.०3 मार्च: निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा घोळ करून भाजपने सर्वाधिक जागा बळकावल्या. त्यामुळे निवडणूक रद्द करण्यात यावी. यासह ईव्हीएम हटवा, देश आणि संविधान वाचवा, असा नारा बुलंद करीत सर्वपक्षीय उमेदवार गुरुवार, २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी, उमेदवारांनी बॅलेटद्वारे फेरनिवडणुकीची मागणी केली.
सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी भाजपविरोधात नारेबाजी केली. ईव्हीएम मशिनमध्ये घोळ करून भाजप एकहाती सत्तेवर काबीज होऊ शकली. राज्यात सर्वत्र ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याचे आरोप होत आहे. याविरोधात गुरुवारी सकाळी ११. ३0 वाजता चिटणवीस पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. दरम्यान,आंदोलनकर्त्यांनी फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. मोर्चाला गोवारी टी पॉईंटजवळ आल्यानंतर संविधान चौकात अडविण्यात आले. येथे आंदोलनकर्त्यांनी प्रचंड नारेबाजी करीत निषेध नोंदविला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महापालिका निवडणूक रद्द करावी, फेरमतदान घ्यावे, ईव्हीएम मशिनची सीबीआयमार्फत चौकशी करावी, ईव्हीएम रद्द करून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्या, प्रभाग पद्धती रद्द करण्यात यावी. यासोबतच प्रभाग पद्धतीमुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. मतदारांपयर्ंत मतदान बुथ क्रमांक आणि बुथचे नाव असणार्‍या पावत्या पोहोचल्या नाहीत. ईव्हीएम मशिनसंदर्भात कोणत्याही प्रकारचे नोटीफिकेशन प्रकाशित करण्यात आले नाही, आदींचा समावेश होता. निवडणुकीत मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनियमितता आणि घोटाळा झाला. याचा फटका पराभूत उमेदवारांना बसला आहे. परिणामी, याविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय या सर्वांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात आंदोलन करून व मोर्चा काढून मागणी रेटून धरण्यात आली.
काँग्रेसचे नेते विशाल मुत्तेमवार, शेख हुसेन, शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर, किशोर पराते, चिंटू महाराज, अतुल सेनाड, कांता पराते, सुरेश जग्यासी, मिलिंद सोनटक्के, ईश्‍वर बाळबुधे, माजी महापौर किशोर डोरले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सुशील बालपांडे, असलम मुल्ला, रमन ठवकर, शफीक दिवान, अजीम तौसिफ, मिलिंद सोनटक्के, रवी गाडगे, गुड्डू रहांगडाले, खुशाल हेडाऊ, वंदना इंगोले, मीना तिडके, किरण पाटणकर, अमित बागवे, सय्यल फैजुला, अँड. शैलेश जयस्वाल, चंद्रशेखर चौरसिया, मोतीराम मोहाडीकर, अनिल दुरुगकर यांच्यासह तब्बल ५0 पराभूत उमेदवार व मोठय़ासंख्येत नागरिकांचा मोर्चात समावेश होता.