25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home महाराष्ट्र पोलिस उपनिरीक्षकांसह 7 निलंबित

पोलिस उपनिरीक्षकांसह 7 निलंबित

0
23

नागपूर दि. 9 –: येथील पोलिसांनी अवैध धंद्यांवर कायद्यानुसार अपेक्षित कारवाई न केल्याबद्दल, तसेच कर्तव्यात कसर केल्याच्या आरोपावरून 2 पोलिस उपनिरीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांच्या ढिसाळ कारभाराला धक्का देत ही कारवाई केली. निलंबित पोलिस सावनेर, खापा, कळमेश्वर आणि मौदा पोलिस स्टेशनचे आहेत. या भागात अवैध धंदे, जुगार, सट्टा आणि ताश क्लब चालत असल्याची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा निलंबित कर्मचाऱ्यांवर आरोप होता. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली.