23.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती केंद्राचे उदघाटन

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती केंद्राचे उदघाटन

0
29
तिरोडा,दि.16 : स्थानिक उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून नवनिर्मित प्रसूती केंद्राचे उद््घाटन व रुग्णांना फळवाटपाचे कार्यक्रम पार पाडले. उद््घाटन तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  माजी आमदार भजनदास वैद्य, हरिण मोरे, न.प.अध्यक्षा सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, कृउबास मुख्य प्रशासक डॉ.चिंतामण रहांगडाले, प्रशासक संजयसिंह बैस, अशोक अरोरा, सजानियो अध्यक्ष अशोक अरोरा, भाजपा कार्यकर्ता प्रमोद गौतम, सजू पारधी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिम्मत मेराम, डॉ.अनिल आटे,डॉ.संदेश आगळे, डॉ.कंचन रहांगडाले, डॉ.उषा सांगोळे, डॉ.सचिन खतकल्ले तसेच मोठय़ा संख्येने उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.