जेसीआय व महिला फोरमच्या शिबिरात 21 महिलांचे रक्तदान

0
13
गोंदिया,दि.16 : रक्तदान हे श्रेष्ठदान असून, महिला वर्गात अजूनही मोठ्या प्रमाणात जनजगृती नसल्यामुळे आज बहुधा महिलांचा रक्तदानाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता.परंतु त्यासाठी महिलामध्ये रक्तदांन हेच सर्वात महत्वाचे दान असल्याचे पटवून देण्यासाठी गोंदियात पहिल्यांदाच जेसीआई राईस सिटी व आज महिला फोरमच्या माध्यमातून आज रविवारला(दि.16) रक्तदान शिबीराचे आयोजन गोरेलाल चौक जैन मंदिर येथे करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात 21 महिलांना रक्तदान करुन नव्या अध्यायाची गोंदियात सुरवात केली आहे.या आरोग्य व रक्तदान शिबिरात 72 महिलांनी नोंदणी केली होती. रक्तदान शिबिराचा माध्यमातून महिलांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती होऊन मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा रक्तदान करतील असा विश्वास आयोजक सेजल पटेल यांनी व्यक्त केला.यावेळी बाई गंगाबाई रुग्णालयाचे रक्तपेढी प्रमुख डाॅ. प्रदीप कांबळे,पुरूषोत्तम मोदी,विनय पांडे,डाॅ. स्मिता गेडाम,आम्रपाली आल्टे, स्मिता गिरडकर, रूपलता दूधभुऱे, जितेंद्र खेडकर उपस्थित होते. आयोजन व रक्तदान करणार्यामध्ये जेसी सौरभ जैन, अंकुश डोडानी, कृष्णा शेंडे, नितीन मेश्राम, विशाल ठाकूर, निलेश फुलबांधे, राम ललवाणी,शैलेंद्र कावळे, उमंग साहू, प्रणय अग्रवाल, सागर सोनावणे, स्वाती चव्हाण, रेखा केलनका, शाहीन कुरेशी,श्रृती अग्रवाल, मधुलिका नागपुरे, दिशा कुरुष्णानी, अंजली कौशीक, प्रितिशा केलनका, फरजान अंसारी,विणा लांजेवार, वैशाली  यांचा समावेश होता.