32.6 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home Top News काश्मीरात दहशतवादी हल्ला, 2 दहशतवादी ठार

काश्मीरात दहशतवादी हल्ला, 2 दहशतवादी ठार

0
26

श्रीनगर, दि. 27 – जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पंझगाम येथे पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला. लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने दहशतवाद्यांनी लष्कराच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं.