26.4 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ गॅल्वा कंपनीविरोधात आमदार बच्चू कडू आक्रमक

गॅल्वा कंपनीविरोधात आमदार बच्चू कडू आक्रमक

0
30

वर्धा,दि.29 : कुठलाही मुद्दा असो तो सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे आमदार बच्चू कडू यांचा रुद्रावतार पुन्हा एकदा वर्ध्यात पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षात 36 कामगारांना कामावरुन कमी करणाऱ्या उत्तम गॅल्वा कंपनीच्या प्रशासनासोबत चर्चेसाठी गेलेले आमदार बच्चू कडूंचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांवरच पाण्याची बॉटल भिरकावली. त्यानंतर पोलिसांनी आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का देत कंपनीच्या बाहेर काढले.

कंपनीतील कामगारांनी आ.कडू यांच्याकडे जाऊन मदत मागितली त्यावर कडू यांनी कंपनी प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी गेले होते.त्यावेळी कंपनीच्यावतीने मॅनेजमेंटचे लोक नाहीत असे सांगितल्याने फोनवर तरी बोलणे करुन द्या असे कडू म्हणाले.मात्र टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येतात कडू यांनी आपल्या आक्रमक शैलीचा परिचय देत कंपनीसमोरच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे.कंपनीतून निघणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे लगतच्या गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागते. येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा ‘बच्चू कडू स्टाईल’ने 25 हजार लोकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

blank