स्व.मनोहरभाई पटेल यार्डात ११ मे पासून धान खरेदी
गोंदिया,दि.02-शेतकरी हितासाठी काम करणाèया गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीने येत्या ११ मे पासून बाजार समितीच्या स्व.मनोहरभाई पटेल यार्डात धान खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी जुन्या बाजार समिती परिसरात ९ मे पासूनच धान खरेदी बंद होणार असल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे व इतर संचालकानी पत्रपरिषदेत दिली.
३१ मार्चच्या संचालकांच्या सभेत सावराटोली स्थित नव्या मार्केटमध्ये बाजार स्थानातरिंत करुन जुन्या मार्केट यार्डचे नव्याने नुतनीकरण करुन तिथे फळ व भाजीपाल बाजार सुरु करण्याचा विचार असल्याचे संचालकांनी सांगितले.मात्र काही व्यापारी अडेलतटू धोरण राबवून नव्या यार्डात जाण्यास आडकाठी निर्माण करीत असल्याचा आरोपही केला.२०००-२००१ मध्ये कर्ज घेऊन तयार करण्यात आलेल्या परिसरात सर्वच सोयी असून मोठमोठे यार्ड तयार करण्यात आले आहे.मोठे व पक्के रस्ते,विजेची सोय,पाण्यासाठी ४० हजार लीटर पाण्याची टाकी तयार असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी सुध्दा या परिसरात सुरु करण्यात आलेली आहे.२ मेपासूनच धान बाजार नव्या यार्डात स्थानातरींत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.परंतु २९ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधक व व्यापारी आडतिया संघाच्या सोबत झालेल्या बैठकीत काही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुदत मागत ११ मे रोजी स्थानातरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपसभापती ठाकरे,संचालक सुरेश अग्रवाल,कुंदन कटारे,अरुण दुबे यांनी दिली.धान खरेदी पारदर्शक व्हावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावण्यात येणार असून बाजार समितीचे कार्यालयही याठिकाणी हलविण्यात येणार आहे.४ मोठे शेड,१५०० मे.टन क्षमतेचे गोदाम,धर्मकाटा व ७७ व्यापारीगाळे तयार करण्यात आले.या गाळ्यासांठी अडीच लाख रुपेय अमानत रक्कम ठेवत २ हजार रुपये प्रती महिना किराया ठरविण्यात आल्याचे सांगत हे सुध्दा व्यापारी वर्गाला निशुल्क हवे आहे.ते मात्र शक्य नसल्याचे संचालकांनी सांगितले सोबतच शेतकèयाकडून जे झाडणस्वरुपात धान घेण्यात येते ते आणि आजही हमालीसह इतर शुल्कच्या नावान अवैधरित्या आडत घेतली जात असून यावर बंदी घालण्याचा विचार असल्याची माहिती संचालक पंकज यादव यांनी दिली.मनोहरभाई पटेल यार्डात व्यापारी धान खरेदी करण्यास न आल्यास सरळ राईसमिलर्सला खरेदीसाठी बोलावण्यात येईल सोबतच फ्रीसेलच्या माध्यमातून शेतकèयाने आणलेला धान खरेदी करण्यात येणार असल्याचे सचिव जोशी यांनी सांगितले.नवीन यार्डाच्या बांधकामावर आजपर्यंत पाच ते सहा कोटी रुपये खर्च झाले असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या यार्डाचे बांधकाम नव्याने तयार करण्यात येत आहे.येत्या काही दिवसात अजून कामे पुर्ण होणार असल्याने व्यापाèयांच्या भूलथापांना शेतकरी बांधवानी बळी न पडता मोक्षधाम मार्गावरील यार्डात धान विक्रीसाठी आणावे असे आवाहन पत्रपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.या पत्रपरिषदेला संचालक जगदिश अग्रवाल,विठोबा लिल्हारे,आनंदराव तुरकर,मनोज दहिकर,तिर्थराज हरिणखेडे,आशिष चव्हाण,गीता तुरकर,खेमनबाई बिरनवार,हरिचंद कावरे,सुमित भालोटीया आदी उपस्थित होते.
बाजार स्थानांतरणाच्या विरोधात व्यापाèयांची धान खरेदी बंद
दरम्यान धान बाजार नव्या यार्डात स्थानातरिंत होत असल्याच्या मुद्याला घेऊन बाजार समितीमधील धान खरेदी व्यापारी व अडतियांनी बंद केल्याचे चित्र बघावयास मिळाले.या भूमिकेमूळे व्यापारी हे शेतकरी विरोधी भूमिका घेत आपल्या स्वार्थासाठीच काम करीत असल्याचा आरोप संचालकांनी केला.तसेच त्यांचे परवाने रद्द करण्याची वेळ बाजार समितीवर येऊ शकते असेही सांगितले.





