25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News माओवादी आणि पोलीसांत चकमक तीन जवान जखमी

माओवादी आणि पोलीसांत चकमक तीन जवान जखमी

0
31

गडचिरोली,दि.03- गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली-भामरागडच्या जंगलात आज बुधवारला माओवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.भामरागड तालुक्यात कोपर्सीच्या जंगलात ही चकमक सुरु असून जखमी जवानांना हॅलीकॅप्टरने उपचारासाठी रायपुरला हलविण्यात आले आहे. काल मंगळवारलाही या भागात चकमक झाली होती. त्यावरुन माओवाद्यांच्या विरोधात अभियान राबवत असतांना झालेल्या चकमकीत जवान  जखमी झाले.यात जिल्हा पोलीस दलाचे दोन तर सीआरपीएफचा एक जवान आहे.अजुनही कोंबींग आपरेशन या भागात सुरु आहे.पोलीस अधिक्षक देशमुख पुर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत.