कायदा हातात घेउन काम करणाऱ्याची गय करणार नाही-पोलिस अधीक्षक मिना

0
16

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.03:सामान्य माणुस हा माझ्यासाठी अंत्यंत महत्वाचा असुन त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम कार्य करणार आहोत ,त्यामध्ये कुणी जर कायदा हातात घेऊन कोणी जर गैर प्रकार करणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा नांदेड चे नविन पोलिस अधीक्षक म्हणून सूत्रे स्विकारल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सन् 2006 च्या बैचचे आयपिएस असलेले चंद्रकिशोरमिना यानी नागपुर, अकोला, गडचीरोली, गोंदिया येथे सेवा बजावली. मराठवाड्यातील नांदेड येथे प्रथमच नियुक्ति असुन हे आपल्यासाठी आनंदाची व् आश्यर्य ची बाब त्यांनी यावेळी पत्रकारशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी त्यांनी शहरातील समस्या जाणून घेतल्या, यावेळी त्यांनी नांदेड ची लोकसंख्या, व् भौगोलिक स्थिति लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, व् पोलिस प्रशासन च्या मदतीने शहरातील प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कैमरे बसविण्यात आले होते .यामधले अनेक ठिकानचे सीसीटीव्ही कैमरे बंद असुन त्यांच्या देखभलिसाठी प्रयत्न करू सीसीटीव्ही कैमरे चालू स्थितीत रहिल्यास जनतेची सुरक्षा व् तपास साठी नकीच मदत होईल असेही यावेळी म्हणाले.जिल्ह्यातील अवैध व्यवसायना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखासह(एल. सी. बी) विविध पथक आहेत जर असे असताना जर गुन्हेगारी व् अवैध धंदे वाढले यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असेल असे आढळून आल्यास पोलिस अधीक्षक यांचे स्वतन्त्र पथक नियुक्त करुण अवैध व्यवसाय आळा घालण्यात येईल.सामान्य नागरिकसह महिलांच्या सुरक्षाच्या दृष्टिकोण ठेऊन विशेष प्रयत्न केले जातील असे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.