24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home राष्ट्रीय देश दिल्ली – काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा

दिल्ली – काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा

0
23

नवी दिल्ली, दि. ४ – एअर इंडियाच्या दिल्ली – काबूल या विमानाच्या अपहरणाचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला असून यानंतर हायअलर्टचा इशाराही देण्यात आला आहे. दहशतवादी या विमानाचे अपहरण करण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.
१९९९ मध्ये दहशतवाद्यांनी कंदहार येथे आयसी ८१४ या विमानाचे अपहरण करत होते. दहशतवादी पुन्हा याची पुनरावृत्ती करु शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. अपहरणासाठी दहशतवादी एअर इंडियाच्या विमानालाच टार्गेट करतील असे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. यानंतर दिल्ली विमानतळावर हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांसोबतच विमानतळावरील कर्मचा-यांचीही कसून तपासणी केली जात आहे.