26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ वाघ मृतावस्थेत आढळल्याने वनाधिकार्‍यांमध्ये खळबळ

वाघ मृतावस्थेत आढळल्याने वनाधिकार्‍यांमध्ये खळबळ

0
26

चंद्रपूर ,दि.04 : सावली वनपरिक्षेत्रात येणार्‍या पालेबारसा जंगलात वाघ मृतावस्थेत आढळल्याने वनाधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी जय या वाघाची शिकार करून मृत वाघ जमिनीत पुरल्याची घटना उजेडात आली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा एका वाघाच्या मृत्यूची घटना उजेडात आल्याने वनविभागाच्या अधिकार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सावली वनपरिक्षेत्रातील पालेबारसा जंगलातील कक्ष क्रमांक १४८ मध्ये मृत वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती लगेच वनअधिकार्‍यांना देण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघाचा मृत्यू अंदाजे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघाच्या डोक्यावर मार असल्याने दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत मृत वाघाचा पंचनामा व शवविच्छेदन झाले नव्हते.वाघ मृतावस्थेत आढळला