राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची एकत्र आघाडी
गोरेगाव,दि.6 : सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संचालकांकरिता दोन पॅनेल आमोरासामोर आहेत.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किसान विकास पॅनेल तयार केली असून भाजपनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे.उद्या रविवारला( दि. ७) संचालकांकरिता मतदान होऊ घातले असून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास पणन गटात28 मतदार असून सर्वाधिक 17 मतदार काँग्रेस राष्ट्रवादीचे असल्याने या गटात काँग्रेसआघाडीच्या उमेदवाराचा विजय पक्का मानला जात आहे.सहकार व ग्रामपंचायत गटातही किसान विकास आघाडीचे मतदार अधिक असल्याने भाजपने सामदाम दंडाचा वापर आपल्या मतदारांना विजयी करण्यासाठी वापर केल्यास नवे राहणार नाही.पणन गटात काँग्रेस आघाडीचे डेमेंद्र रहागंडाले व भाजपकडून संजय बारेवार रिंगणात आहेत.
गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत एकूण पाच गटांकरिता मतदान घेण्यात येणार आहे. त्यात सर्वसाधारण, महिला राखीव, व्यापारी/ आडत्या गट, हमाल/रेजा/तोलारी, आणि विपणन व प्रकिया असे एकूण गट अहेत. त्याकरिता ४० च्यावर मतदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाजार समितीवर आपले वर्च राहावे याकरिता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी किसान विकास पॅनल तयार केले आहे. त्यात सेवा सहकारी संस्था गटातून अॅड पृथ्वीराज चव्हाण, प्रदीप जैन, अरविंदकुमार फाये, घनशाम बघेले, निलकंठ बोपचे, श्रीप्रकाश रहांगडाले, परशुराम वंजारी, तर महिला गटातून मंजू कुसराम, गिता बघेले यांचा समावेश आहे. तसेच नानाजी मेश्राम, कुशन चौधरी, मदनलाल कोटांगले, डिलेश्वरी तिरेले, जितेंद्र कटरे, निंलाजी डहारे, गुजोबा वाघाडे आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपकडून व्यापारी गटात मोरेश्वर कटरे,ग्रामपंचायत गटातून माणिकचंद कटरे,सहकार गटातून डाॅ.किशोर गौतम,डोमाजी बोपचे, व्यंकट कटरे,ओमप्रकाश शरणागत,रिषीपाल टेंभरे हे सुध्दा रिंगणात आहेत.गेल्या पाच वर्षात बाजार समितीला अ वर्गात आणून सहकार क्षेत्रात बाजार समितीची प्रतिष्टा विद्यमान काँग्रेस राष्ट्रवादीच्या संचालकांनी टिकवून ठेवली असून पुन्हा आपल्याला सत्ता मिळाल्यास शेतकर्यांच्या हिताकरिता अहोरात्र झटणार असल्याचे किसान विकास पॅनेलने म्हटले आहे. ही निवडणूक गोरेगाव तालुक्यात अत्यंत चुरशीची झाली असून कोण बाजी मारतो, हे येणारा काळ ठरविणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन झामसिंह बघेले,पी.जी.कटरे,केवल बघेले,मलेशाम येरोला,जगदिश येरोला,सी.टी.चौधरी,धनलाल पिसे,शसेंद्र भगत,डुमेश चौरागडे,सोमेश रहागंडाले,विवेक मेंढे,विशाल शेंडे आदींनी केले आहे.





