24.2 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home विदर्भ तुमसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

तुमसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

0
27

तुमसर,दि.09- तालुक्यात सध्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली असून ही कुत्री येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करून चावा घेत आहेत. आतापर्यंत तब्बल ३० लोकांना पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे संबंधीत नागरिकांना तुमसर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे रुग्णालयात जखमींची गर्दी वाढली असून उपचार सुरु आहे. तुमसर शहरातील शिवाजी वार्ड, गांधी वार्ड व नेहरू वार्ड या वार्डात कुत्र्यांची दहशत जास्त आहे. यात जखमींनी सांगितल्याप्रमाणे एकाच कुत्र्याने सगळ्यांना चावा घेतल्याचे बोलल्या जात आहे. यामुळे तुमसर शहरात भितीचे वातावरण पसरलेले असून नगरपरिषदेने कुत्र्याला पकडण्यासाठी पथक तयार केले आहे.