नांदेड,दि.10- नांदेडकरांसाठी केवळ चार दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असताना शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या गेल्या दोन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी या प्रश्नावर मंत्रालय पातळीवर तसेच जिल्हा प्रशासनाशी संवाद साधून निम्न दुधना प्रकल्पातून २० दशलक्ष घनमीटर पाणी आज नांदेडसाठी सोडण्यात आले. यामुळे येत्या दोन महिन्यातील नांदेडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
१५ दिवसांपूर्वीच दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी १० टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र गोदावरीचे पात्र जवळपास ३० किलोमीटर कोरडे पडल्याने तसेच त्यात खड्डे पडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पापर्यंत केवळ १ टीएमसी पाणी येऊ शकले. त्यामुळे नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. नांदेडकरांसाठी केवळ चार दिवसाचा पाणीसाठा उपलब्ध असताना शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. ग्रामीण भागात दिग्रसचे पाणी पोहंचवून गोदावरीला चांगले पाणी आल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात सोय झाली खरी, मात्र नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. दिग्रस बंधाऱ्यांचे केवळ १ टीएमसी पाणी हे विष्णूपुरी प्रकल्पात मधल्या खाच खळग्यामुळे पोहंचू शकले.
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी शासनस्तरावर याबाबत सातत्याने संवाद साधून गेल्या २४ तासापासून युध्दपातळीवर प्रयत्न केले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्वâ साधून अखेर परभणी जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पातून नांदेडच्या विष्णूपुरीसाठी २० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. सदरचे पाणी दुधना नदीतून पूर्णा नदीत येईल व तेथून वंâठेश्वर येथे गोदावरी नदीत येवून ते विष्णूपुरीला पोहंचेल. यामुळे नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किमान दोन महिन्यासाठी तरी सुटला आहे. विष्णूपुरीत पाणी नसल्याने व केवळ तीन दिवसाचा साठा उपलब्ध असल्याने नांदेडकर त्रस्त झाले होते. प्रशासन देखील याबाबत काळजीत पडले होते. मात्र पालकमंत्री अर्जुन खोतकर व शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न करुन अखेर नांदेडकरांना आज हे पाणी सोडावयास भाग पाडले. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला असला तरी पाण्यासाठी असलेले आरक्षण व कायदेशीर बाबी पूर्ण करुन पालकमंत्र्यांनी नांदेडकरांना दिलासा दिला आहे. याबद्दल बोलताना आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले की, दिग्रस बंधाNयातील पाण्यामुळे ग्रामीण भागातील किमान ४० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच रब्बी हंगामातील पिकांचा प्रश्न यामुळे सुटला आहे. वीज मंडळाने देखील यावेळी या भागातील शेतकNयांवर मेहरबानी दाखवत कुठल्याही डिपी व मोटारीवरचा वीज पुरवठा तोडला नाही. त्यामुळे ग्रामीण व शहरी दोन्ही भागाला यामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. राज्य सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ज्या तळमळीने याबाबत तातडीची पावले उचलली व शेतकऱ्यांना तसेच नांदेड शहरवासियांना दिलासा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
उपअभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोअर दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही २४२.२० दशलक्ष घनमीटर एवढी आहे. यावर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. आज शासनाने दिलेल्या आदेशानुसार नांदेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी या दुधना प्रकल्पातून १८६० घनफूट प्रति सेकंद या वेगाने हे पाणी सोडण्यात येत आहे. १६० किलोमीटरचा पल्ला गाठून हे पाणी तीन दिवसानंतर विष्णूपुरी प्रकल्पात पोहंचेल.



