24.9 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home महाराष्ट्र मुदखेड – शिवनगाव दरम्यान तिरुपती एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरली

मुदखेड – शिवनगाव दरम्यान तिरुपती एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरली

0
33

नरेश तुप्टेवार

नांदेड,दि.10 : नांदेड ते तिरुपती एक्सप्रेस रेल्वे शिवणगाव रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरली असून इंजिन मागील दोन डब्बे एकमेकांवर आदळले आहेत.यात कसलीही जीवीत हाणी झाली नसून अपघातामुळे हैद्राबाद कडून येणा-या रेल्व थांबविण्यात आल्या आहेत.
एका प्रत्यक्षदर्षीच्या मते रात्री ०९ वाजता नांदेड तिरुपती एक्सप्रेस क्र.०७६०६ ही मुदखेड कडून हैद्राबादकडे जात जातांना शिवणगाव रेल्वे स्थानकाजवळ आली असता रेल्वे धावपट्टीवर एक मोटार सायकल पडलेली होती ती इंजिनच्या समोरील दाबाने धावपट्टीत अडकली व इंजिन रुळावरुन घसरले.धावपट्टी तुटली आणि धावते इंजिन खाली घसरल्याने इंजिन माघील दोन डब्बे एकमेकांवर आदळे.या अपघातात जीवित किंवा अन्य हाणी झाली नसली तरी वाहतूक मात्र खोळंबली आहे.

धर्माबाद रेल्वे थ्थानकावरुन एक इंजिन तात्काळ घटनास्ळी रवाना झाले.मात्र धावपट्टी तुटली असल्याने रेल्वे पुढे नेणे अशक्य आहे.मुदखेड जंक्शन वरुन रेल्वे कर्मचारी ही दुरुस्ती व मदतीसाठी तेथे पोहचले आहेत.परंतू धावपट्टी दुरुस्त करण्यासाठी बराच अवधी लागणार असल्यामुळे तुर्तास हैद्राबाद कडून मुंबईकडे जाणा-या व मुंबई कडून हैद्राबादकडे जाणा-या रेल्वे सकाळ पर्यंत रद्द करण्यात आल्याचे कळते