23.8 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप- उद्धव ठाकरेंचा इशारा

शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप- उद्धव ठाकरेंचा इशारा

0
18
शेगाव, दि. 15 -महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्या नात्यात पुन्हा एकदा कटूता आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मध्यावधीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत अशावेळी मध्यावधी निवडणुकीसाठी पैसे आहेत का, असा सवाल शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमत्र्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप येईल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
‘सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे त्याची अंमलबाजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो अशी प्रार्थना करतो’, असेही उद्धव ठाकरे बोलले आहेत. तसेच कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही असंही बोलले आहेत. शेगावमधील पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.’आपला कृषीप्रधान देश आहे, मात्र शेतक-यांना सर्वात तुच्छतेची वागणूक दिली जाते’, अशी खंत यावेळी उद्दव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.  ‘देशभरात शेतक-यांचा जो उद्रेक दिसतोय ती ठिणगी महाराष्ट्रात पडल्याचा आनंद’, असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. ‘साले’ म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंसहित शेतक-यांवर टीका करणा-यांना टोला हाणला आहे. ‘आंदोलन पेटण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला याचा आनंद आहे. सत्तेत असतानाही आम्ही विरोधात उभे राहिलो’, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर बोलताना ‘मुख्यमंत्र्यांना शेतकरी कर्जाचा विषय बाजूला ठेवायचा असल्याने मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असावा’, असा टोला हाणला. ‘एवढा पैसा असेल तर तो शेतक-यांना द्या. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत तुमचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही’, असा इशाराचा मुख्यमंत्र्यांना दिला आहे,
blank