41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News वीज कोसळल्याने कालेश्वर मंदीराचे कळस ढासळले

वीज कोसळल्याने कालेश्वर मंदीराचे कळस ढासळले

0
22

blank

गडचिरोली,दि. २० : महाराष्ट्र – तेलंगणा – आंध्रप्रदेशच्या सीमेवर वसलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कालेश्वर मंदिरावर आज सायकाळच्या सुमारास वीज कोसळल्याने मंदिराच्या मुख्य शिखराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा तालुकास्थळाला लागूनच असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून कालेश्वर मंदिराची ओळख आले. तेलंगणा राज्यातील गोदावरी नदीकाठावर वसलेल्या कालेश्वर मंदिरावर आज सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान मंदिरावर वीज कोसळून या मंदिराचा कळस कोसळला. तसेच मंदिरातील वीज मीटरही जळून खाक झाले.

blank