33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ वन पट्टा मिळाल्याने ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढेल -आ.कीर्तिकुमार भांगडिया

वन पट्टा मिळाल्याने ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढेल -आ.कीर्तिकुमार भांगडिया

0
28

blank

चिमूर,दि.23-मागील अनेक वर्षांपासून वनपट्टे मिळण्यासाठी प्रलंबित मागणी भाजप शासनाने मंजूर करीत ग्राम पंचायतना वन पट्टे मिळाल्याने ग्राम पंचायतचे उत्प न्नाचे स्तोत्र वाढेल आणि गावाचा विकास होईल, असे कीर्तिकुमार भांगडिया बोलले.चिमूर तालुक्यातील ३0 ग्राम पंचायतीना वनहक्क पट्टे वाटप तहसील कार्यालयातिल कार्यक्रमात आ. कीर्तिकुमार भांगडिया बोलत होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार पाटील मॅडम पंचायत सदस्य अजहर शेख, कृ उ.बा.स.संचालक कलिम शेख आदी उपस्थित होते चिमूर तालुक्यातील मदनापूर, पेठ भांसुली, पळसगाव, बोथली, सावरला सोनेगाव वन, नवतळा, गोंदोडा, शिवापूर बंदर, अंबोली, भिवकुंड, बोडधा, पुयारदंड, मुरपार, लावारी, मौशी, हिरापूर, खडसंगी, अमरपुरी आदी ३0 ग्राम पंचायतना वन हक्क पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच,ग्रामसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

blank