24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

0
23
हैदराबाद,दि.23(वृत्तसंस्था)- कार्टोसॅट-2 मालिकेतील तिसऱ्या सॅटेलाइटचे आज श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या लेटेस्ट रिमोट सेंसिग उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दहशतवाद्याची ठिकाणे शोधण्यास मदत होणार आहे. या उपग्रहामुळे छोट्या बाबींची छायाचित्रे देखील प्राप्त करता येणार आहेत. याच सीरीजमधील आधी लॉन्च करण्यात आलेल्या दोन सॅटेलाइटचे रेझ्यूलेशन 0.8 मीटर होते. या तिसऱ्या सॅटेलाइटचे रेझ्यूलेशन 0.6 मीटरचे आहे. यामुळे हॅ सॅटेलाइटमुळे लहानातील लहान बाबीचे छायाचित्र टिपता येणार आहे. कार्टोसॅट-2 सोबतच 31 नॅनो सॅटेलाइटदेखील लॉन्च करण्यात आले आहेत.माहितीनुसार, या उपग्रहात असलेल्या तांत्रिक क्षमतांमुळे संरक्षणविषयक माहिती अधिक अचूक मिळेल. याचा वापर दहशतवाद ठिकाणे, बंकर्स शोधण्यास आणि लष्करी माहितीची पडताळणी करण्यात होऊ शकेल.हे उपग्रह ऑपरेशनल झाल्यानंतर ते लष्कराला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. लष्कराकडे यासंदर्भातील आवश्यक मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान आहे.
इस्त्रोने आज सोडलेल्या 31 उपग्रहांपैकी 29 उपग्रह हे 29 देशांचे आहेत. यात ऑस्ट्रिलिया, बेल्जियम, ब्रिटन, चिली, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, स्लोवाकिया, अमेरिका, लातीविया, लिथुआनिया या देशांचा समावेश आहे.