नीट परीक्षेचा निकाल जाहीर

0
12

नवी दिल्ली, दि. 23 – वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश 12 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

खरंतर मद्रास उच्च न्यायालयाने हे निकाल जाहीर करायला स्थगिती दिली होती. MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्याक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच नीट परीक्षा मागच्यावर्षीपासून सुरु झाली आहे. सीबीएसईने मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.महाराष्ट्रातून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. देशभरातील जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. महाराष्ट्र सरकारने केवळ एमबीबीएस नव्हे, तर सर्वच वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’चा गुणवत्ताक्रम लागू केला आहे.