24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ देऊटोला येथे बीज प्रकिया व मृदा तपासणीचे प्रात्यक्षिक

देऊटोला येथे बीज प्रकिया व मृदा तपासणीचे प्रात्यक्षिक

0
25

गोरेगाव,दि.24-तालुक्यातील हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनीनी तालुक्यातील देऊटोला येथील शेतकर्यांच्या शेतात जाऊन बिज प्रकिया व उत्पादन प्रकियेचे प्रात्यक्षिक करुन बिज रोपणाची माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राध्यापक बहेकार व टेंभेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पाटील सुनिता मानकर,ग्रामपंचायत सदस्य देवका पटले,तारांचद कटरे,विठ्ठल मानकर,गीताबाई कटरे यावेळी उपस्थित होत्या.काजल गुरनुले,राखी परिहार,रुहानी मुसराम,श्रध्दा इंगळे,दिक्षा पटले,डिंपल कोरे,वैशाली कोसरे,दिपा नांदगाये या विद्यार्थीनीनी शेतकर्याना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.त्याचप्रमाणे देऊटोला येथीलच शेतकरी सुरेश कटरे यांच्या शेतात मृदा तपासणी करुन माहिती देण्यात आली.प्रा.श्रीमती गभणे यांनी माती तपासणीने होणारे लाभ काय असतात याची माहिती दिली.