24.3 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home महाराष्ट्र नांदेडमधून अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना

नांदेडमधून अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना

0
29
नांदेड,दि.4- येथून सोळाव्या अमरनाथ यात्रेला जाणा-या  72 यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावर मोठया प्रमाणात जमलेल्या नागरीकांना धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्यासह सर्व यात्रेकरूंचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
पहिल्या जथ्थ्यामध्ये अॅड.प्रकाश तळेगावकर, रंगराव पांडे,  अतुल बियाणी, भगवानराव आसना, किशोर काकाणी, कैलास बियाणी, राजेश्वर बिडवइ्र, गोविंद सोनटक्के, वसंत देव, सुरेश सोळूंके, व्यंकटेशराव भाई  हे सपत्निक हैद्राबाद मार्ग विमानाने जाणार आहेत. रेल्वेतून अॅड. सतीश जाजू, शंकरअण्णा  सिलपल्ली, रामराव पाटील, कमलाकर केसकर, प्रशांत तातोडे, डाॅ. बाळकृष्ण जोशी, भास्कर रायपत्रेवार, विजयसिंह बिसेन, सुर्यकांत शिनगरवाड, तुकाराम कोतेपल्लू, तानाजी नरवाडे, महेश तांडूरकर यांच्यासह इतर यात्रेकरू रवाना झाले. नांदेड रेल्वे स्थानकावर त्यांना निरोप देण्यासाठी विविध पक्षाचे,समाजिक संघटनाचे पदाधिकारी, नातेवाईक  व मित्रमंडळीनी मोठी गर्दी केली होती. ढोल ताश्यांच्या गजराने व प्रचंड जयघोषाने रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून गेला होता. पंधरा दिवसाच्या यात्रेमध्ये अनेक धार्मिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. जमलेल्या सर्व नागरिकांचे अमरनाथ यात्रीच्या वतीने अॅड. दिलीप ठाकूर यांनी आभार  व्यक्त केले.