27.5 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home Top News वाघांचा मृत्यू दाबण्याचा प्रयत्न

वाघांचा मृत्यू दाबण्याचा प्रयत्न

0
24

चंद्रपूर,दि.04- जिल्हा हा वनांचा जिल्हा आणि त्यातल्या त्यात वाघांचा जिल्हा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून इथे होत असलेल्या वाघांच्या मृत्यूमुळे फार चर्चेत येतांना दिसत आहे. चंद्रपूर येथील ताडोबा क्षेत्रातील बफर झोन मधील जानाळा जंगल परीसरात पुन्हा २ वाघ मृतावस्थेत आढळल्याने वन विभागात खळबळ माजली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित विभागाने ही घटना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मृतावस्थेत आढळलेल्या वाघांच्या बछळ्याचे अंदाजे वय दीड वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. डोनी-फुलजरी बफर जंगलातील वाघांच्या घटनेने आणि या घटनेला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित वनविभाग आता चर्चेत आला आहे.