शेतकर्यांच्या मदतीला धावले डॉ.सतिश वारजुकर

0
12

चिमूर,दि.4:- चिमूर तालुक्यातील सावरी ते बोथली येथील पांदन रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील सिमेंटचे पाईप वाहुन गेल्याने ये जा करण्यास अडथळा निर्माण झालेला होता,सोबतच शेतकर्यांचेही नुकसान होत होते.याबाबतची माहीती माजी जिल्हा परीषद सदस्य डॉ. सतिश वारजुकर यांना मिळताच शेतकर्यांच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी स्वतःच्या विकास निधीतुन पंन्नास हजार रूपयाची मदत जाहीर केली. सावरी- बोथली नाल्यावर रोजगार हमी योजने अंतर्गत सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. मागील वर्षाच्या पावसात वाहुन गेल्या. त्यामुळे पाण्याचा प्रवाह पुढे जात नसल्याने शेतात जायचे त्यामुळे शेतीचे नुकसान व्हायचे  त्यामुळे त्याचे पुन्हा बांधकाम करण्याची मागणी शेतकर्याकडून होत होती.जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती गुनवंत पाटील कारेकार यांनी ही बाब जिल्हा परीषदेचे गटनेते डॉ.सतिश वारजुकर यांचे लक्षात आणून देत ग्रामपंचायत सावरीला भेट देत समस्या जाणून घेतली.सोबतच वाहून गेलेल्या नाल्यावरील पाईपची पाहणी केली.यावेळी सावरी ग्रामपंचायतला २० खुर्च्या देण्याचे जाहीर केले. यावेळी सावरीचे सरपंच ललीता केळझरकर. उपसरपंच रविंद्र शेंडे. खुशाल डाहुले. पिंपलेश्वर निखाडे. सुभाष कारेकर. ईश्वर ठाकरे व गावकर्यांची उपस्थिती होती.