36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News पोलिसांनी केले नक्षल्यांचे स्मारक उद्ध्वस्त

पोलिसांनी केले नक्षल्यांचे स्मारक उद्ध्वस्त

0
28

blank

गडचिरोली,दि.29:गडचिरोली,गोंदियासह सिमावर्ती भागात नक्षल्यांकडून २८ जुलै ते ३ अॉगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या नक्षल सप्ताहाला जनतेकडून पहिल्यांदा खुल्या स्वरुपात ठिकठिकाणी विऱोध केला जात आहे.या विरोधामुळे पोलिसांच्याही मनोबलात वाढ झाली असून आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिसंवदेनशिल भागात नक्षल्यांनी तयार केलेल्या पोमके धोडराज हद्दीतील मौजा पेनगूंडा येथील नक्षल स्मारक व पोमके कोठी हद्दीतील तुमरकोडी- तोयनार येथील नक्षल स्मारकाला उद्धवस्त केले आहे.नक्षल्यांविरोधात आता आदिवासी बांधव रस्त्यावर उतरल्याचेही चित्र आहे.नागरिकांच्या सहकार्यामुळेच जिल्हा पोलीस व सीआरपीएफला नक्षल्यांचे स्मारक उध्दवस्त करण्यात यश आले आहे.

blank