सडक अर्जुनीच्या राजर्षी शाहू महाराज कृषी काॅलेजात रॅंगिगचा प्रकार

0
6

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिले काॅलेज प्रशासनाला निवेदन
सडक अर्जुनी,दि.29-येथील राजर्षी शाहू महाराज ऍग्रीकल्चरल कॉलेजमध्ये प्रथम वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थी,विद्यार्थ्यींना रॅंगीगचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी करणे,धमकावणे यासारख्या प्रकारच्या घटनांच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडे पोचल्याने आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी संघटेनेचे प्रदेश सचिव आशिष आवळे यांच्या नेतृत्वात काॅलेज प्रशासनासह प्राचार्यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात प्रथम वर्गावतील विद्यार्थ्यांना रँगीगच्या नावावर धमकावले जात असून मुले भयभीत झाल्याचे म्हटले आहे.रँगीगच्या धाक दाखविणार्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही म्हटले आहे.रंगीगच्या प्रकारामुळे मुलामुलींचे काही बरेवाईट झाल्यास काँलेज प्रशासन जबाबदार राहणार असा ईशाराही दिला आहे.निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे आकाश गुप्ता,शुभम वानखेडे,हेमंत पाटील,कुणाल सोरते,प्रफुल्ल लूटे,शुभम गेडाम,आनंद वासनिक,गोलू तिरपुडे,प्रकाश दुपारे आदी उपस्थित होते.