गुरूनानक शाळेच्या स्वयंपाक कक्षाला लागली आग

0
9

गोंदिया,दि.29- शहरातील मुख्य बाजारपरिसराला लागून असलेल्या भागातील गुरुनानक शाळेतील स्वयंपका कक्षात मध्यान्ह भोजन बनविण्याचे काम सुरू असताना आज शनिवारला दुपारच्या सुमारास सिलिंड़रचा पाईप लिकेज झाल्याने आग लागल्याची घटना घडली.या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. परंतु शाळा परिसरात एकच खळबळ माजली होती.दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शाळेत पोचून आगीच्या घटनेची माहिती घेत उपाययोजना व्यवस्थित करण्याचे निर्देश देत संपुर्ण माहिती त्वरीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनास दिले.विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन बनवतेवेळी अचानक गॅस सिलींडरचे पाईल लिकेज झाला. दरम्यान लाकडी स्टूलवर असलेल्या गॅस शेगडीने पेट घेतला. हळहळू आगीने संपूर्ण स्वंयपाक कक्षालाच आपल्या ताब्यात घेतले.मात्र, शाळेत असलेल्या अग्नीशमन यंत्रामुऴे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान शाळेत लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आग लागल्याचे दृश्य दिसताच सर्व विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गंभीर घटना घडली नाही.