36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ लिल्हारे स्विकारणार सहा.बीडीओ मनरेगाचा पदभार

लिल्हारे स्विकारणार सहा.बीडीओ मनरेगाचा पदभार

0
37

गोंदिया,दि.31- ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने राज्यातील सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या विनंती बदल्या केल्या असून गोंदिया जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाच्या सहाय्यक गटविकास अधिकारी या रिक्त पदावर कामठी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सतिश लिल्हाले यांची नियुक्ती केली आहे.लिल्हारे यांची नियुक्ती रिक्त पदावर करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे वर्धा पंचायत समितीच्या सहा.गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांची अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पंचायत समितीला व वर्धा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी.पी.राऊत यांची सुभाष जाधव यांच्या बदलीने रिक्त झालेल्या कुही पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर करण्याचे आदेश 29 आगस्ट रोजी काढण्यात आले आहे.

blank