
गोंदिया ,दि.05-: श्री संप्रदायच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील qहगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथे ६ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय नि:शुल्क युवा आत्मप्रेरणा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात जिल्ह्यातील युवकांनी अधीक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सचिव विजय जोशी यांनी केले आहे.
विज्ञान, व्यवहार व अधात्म यांची सांगड घालून जीवन कसे जगावे. अधात्म हे अनुभूतीचे शास्त्र आहे. जसे, हवा हा दाखवता येत नाही तो अनुभव करता येतो. भूक ही दाखवता येत नाही पण ती अनुभवता येते. अशाप्रकारी मन, बुद्धी व आत्मा यांची ओळख फक्त सतगुरू करून दाखवतात. यासाठी धकाधकीच्या जीवनात दुःखात हा सयंम व सहनशिलता आत्मसात करून घेण्यासाठी अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात येत असून जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे उत्तराधिकारी प.पु. कानिफनाथ महराज यांच्या मार्गदर्शनात हा शिबिर होत आहे. हा शिबिर ३ दिवस निःशुल्क आहे. यामध्ये राहणे व जेवनाची व्यवस्था सेवा समितीद्वारे आयोजित केली आहे. आदर्श व संस्कृती जीवनासाठी जिल्ह्यातील युवकांनी याचा लाभ घ्यावाा व या शिबिराद्वारे आत्मप्रेरणाचा अनुभव घेऊन युवावस्थेत उत्तम परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन श्री संप्रदायचे जिल्हा सचिव विजय जोशी यांनी केले आहे.




