30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राष्ट्रीय देश रन फॉर युनिटी: नव्‍या पिढीला सरदार पटेल यांची ओळख करुन देण्‍यात आली...

रन फॉर युनिटी: नव्‍या पिढीला सरदार पटेल यांची ओळख करुन देण्‍यात आली नाही- पंतप्रधान मोदी

0
21
नवी दिल्‍ली(वृत्तसंस्था)दि.त31- सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या 142व्‍या जयंतीनिमित्‍त आज देशभरात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्‍यात आले आहे. यंदा प्रथमच देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांची जयंती एकता दिन म्‍हणून साजरी केली जाणार आहे. याप्रसंगी नवी दिल्‍ली येथील एकता दौडला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना एकतेची शपथही दिली. याप्रसंगी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री राजनाथ सिंह, क्रिकेटर सुरेश रैना, हॉकी टीमचे कॅप्‍टन सरदारा सिंह आणि केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांची उपस्थिती होती.
उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्‍हणाले, ‘ आज सरदार पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्‍यतिथी आहे. सरदार पटेल यांच्‍या दुरदृष्‍टीमुळे देशाची एकता अबाधित राहिली. त्‍यांनी ब्रिटीशांच्‍या विभाजनवादी मनसुब्‍याला पुर्ण होऊ दिले नाही. दृढशक्‍ती आणि आपल्‍या कौशल्‍याच्‍या बळावर त्‍यांनी देशातील शेकडो राजे आणि संस्‍थानांचा भारतात समावेश केला. देशाला एका सुत्रात बांधण्‍यामध्‍ये सरदार पटेल यांचे मोलाचे योगदान आहे.’ ‘देशातील नव्‍या पिढीला मात्र या महान व्‍यक्तिमत्‍वाची ओळख करुन देण्‍यात आली नाही. इतिहासामधून त्‍यांना वगळण्‍याचे प्रयत्‍न झाले. एखाद्या राजकीय पक्षाला त्‍यांचे महात्‍म्‍य मान्‍य असो किंवा नसो, आमची पिढी त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाचा विसर इतिहासाला पडू देणार नाही.’
‘देशाने आम्‍हाला सेवेची संधी दिली आहे. पुढच्‍या पिढीपर्यंत त्‍यांचे काम पोहोचवण्‍यासाठी आम्‍ही एकता दौडचे आयोजन केले आहे. एकदा राष्‍ट्रपती राजेंद्र प्रसाद म्‍हणाले होते की, ‘आज बोलण्‍यासाठी आणि विचार करण्‍यासाठी आपल्‍याला भारत नावाचा देश उपलब्‍ध आहे. हे केवळ सरदार पटेल यांचा मुत्सद्दीपणा आणि प्रशासनावर असलेली जबरदस्‍त पकड यामुळे शक्‍य होऊ शकले.’ असे असतानाही आपण सरदार पटेल यांना विसरुन गेलो. राजेंद्र प्रसार यांनीही याबद्दल खेद व्‍यक्‍त केला होता. आज राजेंद्र बाबुंची आत्‍मा जिथे असेल, हे सर्व पाहून त्‍यांना खूप आनंद होत असेल.’