26.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ लाखनीत राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात

लाखनीत राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात

0
44

लाखनी,दि.31ः- राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथे राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका संध्या हेमणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एकता दिनानिमित्त शपथ घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बा रा निखाडे यांनी केले.

समर्थ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखनी येथे राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला.  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ताराराम हुमे यांच्या अध्यक्षतेखाली एकता दिनानिमित्त शपथ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंडिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक किशोर आळे, पर्यवेक्षक दा ई प्रधान, प्रा विकास खेडीकर, प्रा लोकनाथ भांडारकर आदी शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अक्षय मासूरकर यांनी केले.