30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे नायबतहसिलदारांना निवेदन

सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे नायबतहसिलदारांना निवेदन

0
18

सडक अर्जुनी,दि.१०-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आज जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याच्या मागणीसह पिकविम्याद्वारे शेतकèयांची झालेली फसवणूक थांबवून पिक विम्याचे नियम बदलविणे,ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू लागल्याने शिष्यवृत्तीसाठीची जुनीच प्रकिया राबविणे,नान क्रिमिलेयरच्या उत्पन्न वाढीचा शासन निर्णय काढण्यासह इतर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.त्याअंतर्गत सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसिलदार आर.एम.खोकले यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी
ओबीसी संघर्ष कृती समिती तालुकाध्यक्ष दिनेश हुकरे,कार्याध्यक्ष हरीष कोहळे,उपाध्यक्ष देवेंद्र तुरकर,उपाध्यक्ष लिलेश्वर रहागंडाले,महासचिव देवचंद तरोणे,प्रसिध्दी प्रमुख बबलू महारवाडे,सदस्य हरीदास हत्तीमारे,ओमप्रकाश शिवणकर,राजेंद्र भांडारकर,माधोराव तरोणे,तालुका ओबीसी सेवा संघ अध्यक्ष भुमेश्वर चव्हाण,तालुका ओबीसी महिला अध्यक्ष पुष्पाताई खोटेले उपस्थित होते.