25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Featured News गोरेगावच्या बाबा मेडीकलला 25 वर्ष पुर्ण

गोरेगावच्या बाबा मेडीकलला 25 वर्ष पुर्ण

0
21

गोरेगाव,दि.११: १९९३ मध्ये ११ नोव्हेंबरलाच गोरेगाव तालुक्यातील जनतेला वैद्यकीय सेवा पुरविण्यच्या दृष्टीने गेल्या २५ वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेल्या बाबा मेडीकल स्टोर्सने आज २५ व्या वर्षात पर्दापण करीत आपल्या रजत जयंती वर्ष साजरे केले आहे. व्यवसायामध्ये सलग कुठलेही संकट आले तरी आपला व्यवसाय न बंद करता सातत्याने तो कसा वाढत जाईल या विचारानेच काम करणारे बाबा मेडीकलचे संचालक व गोंदिया केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे विद्यमान कोषाध्यक्ष रुपेश रहांगडाले यांचे गोरेगाव शहरात सर्वत्र कौतूक केले जात असून त्यांच्या या अविरत सेवेबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तालुका स्थळ असलेल्या पण छोटे गाव असलेल्या गोरेगाव येथे नागपूर मार्गावरील आरामशीन समोर लहानशा रोपट्याच्या रुपात सुरु केलेले हे मेडीकल स्टोर्सअ आज विस्तारले असून सर्वच प्रकारच्या वैद्यकीय औषधी सोबतच आता योग गुरु राामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाच्यावतीने तयार करण्यात येणाèया आयुर्वेदिक औषधासह इतर साहित्यांचे ही विक्री सुरु करुन युवनानी व एलोपॅथीसोबत आयुर्वेदिक क्षेत्रातील औषधातही बाबा मेडीकलने पुढाकार घेतला आहे.