डव्वा/पळसगाव येथील आदिवासी विविध कार्यक़ारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस/भाजप प्रणित पॅनलचा विजय

0
12

सडक अर्जुनी,दि.११: अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या पक्षाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्रीत आले. आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुन पराभव झाला. ही निवडणूक सडक अर्जुनी तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल बिलीया तसेच भाजपचे आनंदराव जोशी यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली. ५ नोव्हेंबर ला झालेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती.
काँग्रेस/भाजप प्रणित परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय झाला. यात चंद्रभान बापू कुरसुंगे, आनंदराव कवडूजशी जोशी, उमराव परसराम चौधरी, अनिल हरडे, हिवराज सोqवदा देवरे, नरेश ाबाबुराव येल्ले, सरस्वता नारायण प्रधान, प्रेमलाल परसराम मलये, कुवरलाल गोqवदा कुरसुंगे, वासुदेव डोमा देशमुख, लालदास राऊत यांचा विजय झाला.परिवर्तन शेतकरी पॅनलचे उमेदवार निवडून आणण्यासाठी चेतन वडगाये, विलास चव्हाण, डी.आर. गाते, मायाबाई चौधरी, रंजना चाकाटे, डॉ. भुमेश्वर पटले, नेकचंद बडोले, मधुकर गावराणे, दिलीप राऊत, उमाकांत गहाणे, चंदन फरदे, मेघनाथ उंदिरवाडे, विवेक राऊत, देवलाल कटरे, खुशाल कुरसुंगे या सर्वच तसेच डव्वा/गोपालटोली, पळसगाव, मुंढरीटोला, भुसारीटोला, पाटेकुर्रा, झुरकुटोला येथील काँग्रेस भाजपच्या कार्यकत्र्यांनी व शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादीच्या हातून सत्ता काबीज करण्यास अथक परिश्रम घेवून मोलाचे सहकार्य केले व परिवर्तन शेतकरी विकास पॅनलला विजय प्राप्त केले.