24.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home महाराष्ट्र कमलापूर परिसरात नक्षल्यांविरूध्द बॅनर

कमलापूर परिसरात नक्षल्यांविरूध्द बॅनर

0
19

आलापल्ली,दि.12(सुचीत जम्बोजवार) : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात नक्षल्यांविरूध्द बॅनर लावल्याचे आढळून आले आहे. यामध्ये नक्षल्यांनी केलेल्या आदिवासी नागरिकांच्या हत्यांबाबत जाब विचारण्यात आला आहे. सदर बॅनरवर जय सेवा समिती गडचिरोली उल्लेख करण्यात आला आहे.
बॅनरवर नक्षल्यांनी आजपर्यंत ४९२ आदिवासी नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली याबाबत जाब विचारला आहे. दामरंचा, वेलगुर, भंगारामपेठा, कोयागुडा या गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे पत्रु दुर्गे यांची हत्या का करण्यात आली, रूमलकसा येथील निरपराध लच्चा मडावी आणि लखान यांची हत्या का करण्यात आली, दामरंचा ते कमलापूर रस्ता तयार होवू न शकल्यामुळे एका वर्षात पाच गर्भवती महिलांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण, असा जाब जय सेवा समितीने नक्षल्यांना बॅनरमधून केला आहे.