गोंदिया,दि.12- तालुक्यातील एकोडी तंटामुक्त समितीने दोन भावामध्ये असलेल्या तंट्याचे समझोता करुन निराकारण केले आहे.एकोडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची सभा ११ नोव्हेंबर रोजी ग्राम पंचायत कार्यालय येथे तंटामुक्त अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे यांच्या अध्यक्षते घेण्यात आली.सभेमध्ये आलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आल्याने अर्जदार यशवंत लक्ष्मीचंद चौधरी व गैरअर्जदार फागुलाल लक्ष्मीचंद चौधरी या दोन्ही भावांचे वडीलोपार्जीत शेती व घर आपसी वाटणी करण्याबाबद भांडण होते. त्या भांडणावर तंटामुक्त समितीने चर्चा करुन आपसी समझोता करुन सदर प्रकरण निकाली काढले. यावेळी सरपंच रविकुमार पटले , मेघश्याम हरिणखेडे,सेवक चौधरी,चुन्नीलाल बिसेन, भांडारकर गुरूजी,जगत पटले, श्यामलाल पिछोडे, पटले शाहिर, प्रदिप चौधरी,वारलु बिसेन उपस्थित होते.





