34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Featured News कार अपघातातील जखमींच्या मदतीला धावले शरद पवार

कार अपघातातील जखमींच्या मदतीला धावले शरद पवार

0
28

blank

ब्रम्हपूरी,दि.१५ ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसाच्या विदर्भ दौ-यावर आजपासून आहेत. आज दौ-याच्या पहिल्याच दिवशी पवार नागपूरहून गडचिरोलीला जात होते. त्याचवेळी नागपूर-गडचिरोली मार्गावर भिवापूरजवळ एका कार गाडीला अपघात झाल्याचे दृश्य पाहून पवारांनी आपल्या चालकाला तत्काळ गाडी थांबवायला सांगितली आणि स्वत: गाडीतून उतरून कारमधील जखमींना मदत केली. सुदैवाने जखमींना गंभीर दुखापती झाल्या नव्हत्या. मात्र, त्या सर्वांना गाडीतून बाहेर काढले. त्या सर्वांची विचारपूस करून जवळच्या रूग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आणि मग पवार पुढे आपल्या नियोजित दौ-याला मार्गस्थ झाले. ही घटना पाहून अनेकांनी राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीचे अनोखं दर्शन घडल्याची भावना व्यक्त केल्या आहेत.
 शरद पवार नागपूरहून गडचिरोलीला चालले होते. त्याचवेळी नागपूर-गडचिरोली मार्गावर भिवापूरजवळ एका कार गाडीला अपघात झाला. या अपघातात कारमधील 5 लोक जखमी झाले. गाडी पडल्याने त्यांना बाहेर निघता येत नव्हते. त्याचवेळी पवारांच्या दौ-यातील काही गाड्या चालल्या होत्या. पवारांना कारचा अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले. तसेच स्वत: खाली उतरून पवारांनी त्यांना बाहेर काढण्यास मदत केली.

blank