आदर्श शिक्षक पुरस्कारासह गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार

0
18

गोंदिया,दि.15 : आपला आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास घडविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्ह्यातील आठ शिक्षकांना सन २०१७ चा आदर्श शिक्षक पुरस्कार बालकदिनी देण्यात आले.सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणूक आचार संहिता सुरू असल्याने शिक्षक दिनाचा कार्यक्रम मंगळवारी बालकदिनी जि.प.च्या सभागृहात घेण्यात आला.
कार्यकक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी रवींंद्र ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प.सदस्य शोभेलाल कटरे, रमेश अंबुले, गिरीश पालीवाल, सुरेश हर्षे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, लता दोनोडे, रजनी गौतम, सिमा मडावी, विश्वदीप डोंगरे, सोनवाने, विणा बिसेन, पं.स. सदस्य चंद्रिकापुरे उपस्थित होते.

ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले,त्यात प्राथमिक विभागातून गोंदिया तालुक्यातून निलज येथील जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेतील रोशनलाल यशवंतराव मस्करे, गोरेगाव तालुक्यातील चिल्हाटी येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पुरूषोत्तम गोपाल साकुरे, तेढा येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील राजुकमार धनलाल बागडे, आमगाव येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील (मुले) कविता कालीपद चक्रवर्ती, देवरी तालुक्यातील मेहताखेडा येथील जि.प. प्राथमिक शाळेतील बालचंद महादेव बडवाईक, सालेकसा तालुक्यातील विचारपूर येथील जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पौर्र्णिमा संदीप विश्वकर्मा, तिरोडा तालुक्यातून भजेपार येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील तेजलाल कुसोबा बोपचे तर  माध्यमिक विभागातून आमगाव येथील जि.प. हायस्कूलमधील मधुकर हगरू बुरडे यांचा समावेश होता.यावेळी आठही तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आठही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. संचालन शिक्षिका मंजूश्री देशपांडे तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे यांनी सहकायर केले. यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, मेहंद्र मोटघरे, सुभाष रामरामे, वाय.सी. भोयर, टी.बी. भेंडारकर, डी.बी. साकुरे व खडसे यांनी सहकार्य केले.