25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ तिरोड्यात पार पडली भाजप महिला मोर्च्याची सभा

तिरोड्यात पार पडली भाजप महिला मोर्च्याची सभा

0
17

तिरोडा,दि.16ः- भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्यावतीने जिल्ह्याव्यापी आंदोलनांतर्गत तालुकास्तरावर भाजप महिला मोर्च्याच्या बैठका आयोजित करण्यात आल्या असून आज गुरुवारला तिरोडा येथे महिला आघाडीच्या अध्यक्ष नगरपरिषद सभापती भावना कदम यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश प्रतिनिधी सीता रहागंडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आली.या सभेत महीलांना संघटीत करून काम करणे व शासनाच्या योजनांची माहीती घराघरात पोहचविणे. बुथ तेथे महिला कार्यक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला गायत्री चौधरी,राखी गूणेरीया,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,बाजार समिती सभापती चिंतामण रहागंडाले,चतूर्भूज बिसेन, संजय पारधी,घनश्याम पारधी,तिरोडा महिला मंडळ अध्यक्ष तिमेश्वरी बघेले,संध्या भरने,मूनेश्वरी पारधी,प्रभाताई घरजारे,शशीकला मेश्राम सह मंडळाच्या सदस्या, तथा निवडूण आलेल्या महिला सरपंच व सदस्य उपस्थित होते.