चंद्रपूर,दि.16ः- राज्य शासनाने अडीच वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेला दारूबंदीचा निर्णय रद्द करुन तो उठविण्यासाठी चंद्रपूर लिकर असोसिएशनच्या पदाधिकार्यानी आज गुरुवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले. पवार कालपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. दारुबंदीमुळे परवानाधारक विक्रेते अडचणीत आले असून बार, हाॅटेलमध्ये काम करणारे हजारो युवक बेरोजगार झाले आहेत.यामुळे जिल्ह्यातील आर्थिक घडामोडीवर परिणाम झाल्याचे लिकर असोशिएसनने पवारांना सांगितले.मागील अडीच वर्षात कोट्यवधीची देशी-विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. यातून शासनाच्या दारूबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे. त्यामुळे दारूबंदी उठवून कोलमडलेली जिल्ह्यातील आर्थिकस्थिती पूर्वपदावर आणण्याची मागणी निवेदनातून केली लिकर असोसिएशनचा सदस्यानी केली आहे.





