25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय – शरद पवार

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय – शरद पवार

0
27

चंद्रपूर,दि.16: राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या फाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आताचे राज्यकर्ते करीत आहेत. आता यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली. त्यामुळेच जुनी प्रकरण उकरून गांधी कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. चंद्रपूर येथील  आज झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या फाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आताचे राज्यकर्ते करीत आहेत. आता त्यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली. त्यामुळेच जुनी प्रकरण उकरून गांधी कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे असा आरोपही अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सध्याचे सरकार सत्तेचा गैरवापर करत असून आकसाचे राजकारण सुरू असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकल्यानंतर 6 महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिलं. हा इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत असंही पवार म्हणाले. बोफोर्स प्रकरणावरुन शरद पवारांनी सध्याच्या सरकावर तोफ डागत गांधी परिवाराचा जोरदार पाठराखण केली आहे.

पवार पुढे म्हणाले की, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे आर्थिक प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवले नाही आणि हाताला काम दिलं नाही तर लोक अतिरेकी कार्याकडे (नक्षलवादाकडे) कसे वळतात, हे दिसून आले.सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न त्वरीत न सोडविल्यास राष्ट्रवादी पक्ष हिवाळी अधिवेशनात सरकारला चांगलेच धारेवर धरणार असे सांगत भाजप सरकारने शेतकर्यांची चौफेर गळचेपी केल्याची टिका ही केली.