27.9 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
26

वाशिम/अहमदनगर,दि.16ः- वृत्तपत्र आणि पत्रकार यांच्या न्यायोचित मागण्याचा विचार राज्य आणि केंद्र शासनाने केला पाहिजे, या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषद मुंबई व पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनानुसार पत्रकार बांधवांनी अहमदनगर व वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

अहमदनगर प्रेस क्लब चे अध्यक्ष मन्सूर शेख महेश देशपांडे, सुभाष गुंदेचा , मीनाताई मुनोत, मिठूलाला नवलाख ,  यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान स्थानिक पत्रकारांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, इतर राज्याप्रमाणे पत्रकार पेन्शन कायदा लागू व्हावा, साप्ताहिक व छोटया दैनिकांच्या शासकीय जाहिरात दरामध्ये वाढ करण्यात यावी, मजीठीया आयोग शासनाने लागू करावा, वृत्तपत्र तपासणी मधील जाचक अटी रद्द कराव्यात या तसेच अन्य मागण्यांचे लेखी निवेदन पत्रकारांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना दिले. सकाळ पासून सुरु झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या विविध वृत्तपत्रांचे प्रतिनधी प्रेस फोटोग्राफर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनधिनी सहभाग घेतला.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन पाठिंबा दर्शवला सरकार दरबारी पत्रकारांच्या समस्या मांडून त्यावर लवकरात लवकर सकारत्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू असे विखे यांनी सांगितले.पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याने समाजातील चांगल्या वाईट गोष्टीचा उलगडा तो आपल्या लेखणीतून करतो. तो समाजाचे प्रश मार्गी लावण्यासाठी झटतो, मात्र  त्याला सुद्धा आपल्याव न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.दरम्यान पत्रकारांच्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस , शिक्षक संघ यांच्यासह  विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला.

वाशिम येथील आंदोलनाच्या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे  सरचिटणीस विश्वनाथ राऊत,  शिखरचंद बागरेचा, नंदकिशोर शिंदे, नंदकिशोर नारे, सुनिल मिसर, मदन देशमुख, गणेश भालेराव, अजय ढवळे, पंकज गाडेकर, गजानन देशमुख, वैैलास खामकर, बाळासाहेब देशमुख, राम चौधरी, सुनिल पाटील, भागवत मापारी, दिपक खडसे, राम परंडे, हरिदास बन्सोड, राम लोहकरे, दत्ता महाले, राजदत पाठक, विनोद तायडे, विशाल राऊत, हरिभाऊ गावंडे, महेश बपोरीकर, विलास कोल्हे, भगवान ढोले, सुनिल काकडे, सुशिल मानवतकर, संदिप पिंपळकर, विश्वास वाल्ले, अनिल वाल्ले, प्रा.टि.बी.दाटके, ज्ञानेश्वर कव्हर, बबन खिल्लारे, मुरलीधर सोळंके, पंढरीनाथ महाले, सुनिल कांबळे, निर्मलकुमार बसंतवाणी, विठ्ठल देशमुख, गजानन भोयर, प्रेस फोटोग्राफर सुभाष जाधव, प्रा.गजानन वाघ, रमेश उंडाळ, महादेव धवसे, संतोष वानखेडे, दादाराव गायकवाड आदिंची उपस्थिती होती. वाशिमसह कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड, मालेगाव या तालुक्यामध्ये देखील तालुका पत्रकार संघांनी आंदोलन करून स्थानिक तहसिलदारांना निवेदन दिले. दरम्यान पत्रकारांच्या आंदोलनास शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला.