31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादीच्या नवनियुक्त सरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार आज

राष्ट्रवादीच्या नवनियुक्त सरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार आज

0
22
अर्जुनी/मोरगाव,दि.१७- राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत विजयी सरपंच व ग्रा.पं.सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन  आज १७ नोव्हेंबर रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहात दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून  माजी जि.प.अध़्यक्ष विजय शिवणकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, नरेश माहेश्वरी, जि.प.विरोध पक्षनेता गंगाधर परशुरामकर, माजी आमदार दिलीप बन्सोड, प्रदेश प्रतिनिधी तथा राष्ट्रवादी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापूरे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर,जि.प.सदस्य किशोर तरोणे,भाष्कर आत्राम, पं.स.सदस्य काळसर्पे,सुधीर साधवानी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तेव्हा आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी व कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण़्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे.